इंग्रजीतर भाषांतील संदर्भ
बिबटेक् आज्ञावली मुळात इंग्रजी संदर्भांकरिताच काम करू शकते. स्वराघाताच्या चिन्हांकरिता असणाऱ्या सोयीदेखील त्यात मर्यादित आहेत. लॅटिनेतर लिप्यांकरिता तर त्यातील सोयी आणखी कमी आहेत. ह्याउलट बिबर व बिबलाटेक् युनिकोडात लिहिलेले संदर्भ चालवण्यासाठीच बनवले गेले आहेत.
ह्याचा अर्थ तुम्हाला इंग्रजीखेरीज इतर कोणत्याही लिपीसाठी संदर्भ वापरायचे असतील, तर बिबलाटेक् वापरणे भाग आहे.
दुवे
जर तुम्ही hyperref
हा आज्ञासंच वापरला असेल (पूर्वी पाहिल्याप्रमाणे), तर तुमच्या फलितातील संदर्भ आपोआप दुव्यांमध्ये परिवर्तित होतील. महाजालीय दुवे व DOI ह्यांकरिता ही सुविधा उपयोगी ठरते.
Differences in best practice for BibTeX input between styles
बिबलाटेक् व बिबटेक् ह्यांच्या ओळीअंतर्गत संदर्भांसाठीच्या आज्ञा बहुतांश वेळा सारख्याच असल्या, तरी संदर्भसामग्रीतील उपनोंदींचे प्रकार बिबटेक् व बिबलाटेक्-मध्ये बरेच भिन्न आहेत. बहुतांश नोंदींमध्ये ह्यात फारसा फरक नाही, पण तरी काही बारकावे वेगळे असू शकतात.
ह्यांचे एक उदाहरण म्हणजे URL ही उपनोंद. काही जुन्या बिबटेक् .bst
धारिका (मुख्यत्वे ‘प्रमाण बिबटेक् धारिका’, उदा. plain.bst
, unsrt.bst
, …) महाजालीय दुव्यांच्या शोधापूर्वीच्या आहेत. त्यांमध्ये अशी कोणतीही उपनोंद आढळत नाही, परंतु अनेक नव्या शैलींमध्ये मात्र ही उपनोंद आढळते. जुन्या धारिकांसकट महाजालीय दुवे देण्यासाठीचा सर्वोत्तम तोडगा म्हणजे howpublished
ही उपनोंद वापरणे, परंतु नव्या धारिकांसहित मात्र अर्थात url
ही उपनोंद वापरणे श्रेयस्कर.
जर तुम्ही लिहीत असलेल्या नोंदीचा सर्व क्षमतेसह वापर करायचा असेल, तर त्यातील उपनोंदी व त्यांचे अर्थ समजून घेणे खूप उपयुक्त ठरेल.