गोपनीयतेचे धोरण

वापरकर्त्यांची माहिती

लर्नलाटेक्.ओआरजी ह्या संकेतस्थळात वापरकर्त्यांना कोणतीही माहिती पुरवून प्रवेश घ्यावा लागत नाही. हे संकेतस्थळ गिटहब-पेजेस ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले गेले असल्यामुळे वापरकर्त्यांची कोणतीही माहिती निर्मात्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. गूगल ॲनलिटिक्सप्रमाणे कोणतीही हेरगिरी ह्या संकेतस्थळाकडून केली जात नाही.

स्मृती

ह्या संकेतस्थळातर्फे मूलभूतरीत्या कोणत्याही स्मृती घडवल्या जात नाहीत. हे वापरकर्त्यांच्या प्राधान्यांकरिता असलेल्या पानावर नमूद करण्यात आले आहे, परंतु स्मृती तयार करण्याची निवड वापरकर्ते करू शकतात. ह्या स्मृतींमार्फत मूलभूत टेक्-चालक निवडून ठेवता येऊ शकतो. हे तपशील लर्नलाटेक्.ओआरजी ह्या संकेतस्थळास प्राप्त होत नसून ते केवळ तुमच्या संगणकावर जतन करून ठेवले जातात.

बाह्य सेवा

जर लाटेक्-आज्ञावली चालवण्यासाठी एखादी सेवा वापरण्यात आली तर येथील मजकूर-संपादकातील आज्ञावली https POST ह्या विनंतीद्वारे त्या सेवेस पुरवली जाईल व अशा वेळी ती आज्ञावली त्या बाह्य सेवेच्या गोपनीयता धोरणाच्या अधीन असेल. पुढील दुव्यांवर ती धोरणे वाचता येतील.