अंतर्गत संदर्भांचे दुवे बनवणे
दस्तऐवजातील अंतर्गत संदर्भांना दुव्यांमध्ये रूपांतरित करण्याकरिता hyperref
आज्ञासंच वापरता येऊ शकतो. बहुतेक वेळा हा आज्ञासंच शेवटी वापरणे श्रेयस्कर आहे.
\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\usepackage[hidelinks]{hyperref}
\begin{document}
\section{Introduction}
Some exciting text with a reference~\ref{sec:next}.
\section{Next thing}
\label{sec:next}
More text here.
\end{document}
ह्या उदाहरणात मजकुराचा रंग व दुव्याचा रंग समान ठेवला आहे. hidelinks
हे प्राचल काढून कारण जाणून घ्या!