प्रकरण ३

लाटेक् चालवणे

ह्यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे, लाटेक् बीजधारिका ह्या साध्या पाठ्य मजकुराच्या स्वरूपात असतात. हे समजून घेण्यासाठी तुमची पहिली बीजधारिका एखाद्या मजकूर-संपादकामध्ये उघडून पाहा. उदा. लिनक्स प्रणालीवर जीएडिट, विंडोज़् प्रणालीवर नोटपॅड. लाटेक्-च्या मजकूर-संपादकासारखेच पाठ्य इतर ठिकाणीही आढळते.

लाटेक्-बीजावर प्रक्रिया करून पीडीएफ् फलित कोणत्याही संपादकाशिवायही घेता येते. त्याकरिता आज्ञापटल (टर्मिनल/कमान्ड-प्रॉम्प्ट) वापरावे लागते. आज्ञापटल कसे वापरले जाते हे तुम्हाला माहीत असेल, तर ज्या पुडक्यामध्ये (फोल्डरमध्ये) तुमची लाटेक्-बीजधारिका (उदा. पहिली.tex) आहे, तिथे आज्ञापटलातून जा व पुढील आज्ञा चालवा.

pdflatex पहिली

अथवा

pdflatex पहिली.tex

टेक् हा धारिकेचा प्रत्यय टाकणे पर्यायी आहे. लाटेक् असे गृहीत धरते की ते टेक् प्रत्ययाच्या धारिकेवरच काम करत आहे.

विशेष चिन्हे

जर एखादे विशेष चिन्ह दस्तऐवजात छापायचे असेल, तर \ हे चिन्ह त्या विशेष चिन्हाआधी वापरल्यास बहुतांश वेळा योग्य फलित मिळते. उदा. \{ हे आज्ञावलीत लिहिल्यास { हे फलितात दिसते. मात्र काही ठिकाणी पूर्ण आज्ञा लिहायची आवश्यकता असू शकते. विशेष चिन्हांच्या तक्त्यासाठी पुढील कोष्टक पाहा.

चिन्हआज्ञेचे लघू रूप
(गणितक्षेत्र व साधा मजकूर)
आज्ञेचे दीर्घ रूप
(केवळ मजकूर)
{\{\textbraceleft
}\}\textbraceright
$\$\textdollar
%\% 
&\& 
#\# 
_\_\textunderscore
\ \textbackslash
^ \textasciicircum
~ \textasciitilde

शेवटच्या तीन चिन्हांच्या आज्ञांची लघू रूपे नाहीत. कारण \\ ही आज्ञा ओळतोडीकरिता आहे व \~ तसेच \^ ह्या स्वराघाताच्या चिन्हांसाठीच्या आज्ञा आहेत.