तार्किक मांडणी
ह्या प्रकरणात मांडणीसाठीच्या काही आज्ञा शिकवण्यात येणार आहेत. अर्थकेंद्री अक्षरजुळणी व तिचे फायदे विभागांच्या व याद्यांच्या उदाहरणाने आपण पाहूया.
लाटेक् ह्या आज्ञावलीत बीजाच्या तार्किक मांडणीकडे लक्ष देणे शक्य आहे तसेच दृश्यरूपात थेट बदल करणेही शक्य आहे, परंतु आज्ञावलीच्या रचनेकडे लक्ष देऊन दस्तऐवज बनवणे अनेकदा उपयुक्त ठरते, कारण त्यामुळे आज्ञावलीतील घटकांचा यथेच्छ पुनर्वापर करणे शक्य होते. त्या घटकांचा अर्थ बदलून हव्या त्या प्रकारे नवी मांडणी करणे शक्य होते.
रचना व मांडणी
लाटेक्-मध्ये सारख्या वापरल्या जाणाऱ्या \emph
ह्या आज्ञेपासून आपण सुरुवात करूया. इंग्रजी भाषेच्या मुद्रणात इटालीय अक्षरांसह महत्त्वपूर्ण मजकूर लिहिला जातो. त्यामुळे \emph
ह्या आज्ञेने मुख्यत्वे अक्षरे इटालीय होतात.
\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}
Some text with \emph{emphasis and \emph{nested} content}.
Some text in \textit{italic and \textit{nested} content}.
\end{document}
कदाचित तुम्हाला लक्षात आले असेलच की \textit
ही आज्ञा मजकूर इटालीय करण्याकरिता वापरली जाते. ह्या आज्ञेसह कायम मजकुरास इटालीय वळण प्राप्त होते, त्यामुळे ह्या आज्ञेच्या पोटात पुन्हा हीच आज्ञा वापरली तरी अक्षरे इटालीय राहतात. (वरील आज्ञावलीचे फलित पाहा.) परंतु \emph
आज्ञेचे तसे नाही. ह्या आज्ञेच्या पोटात पुन्हा हीच आज्ञा वापरली, तर तिच्या फलितात फरक पडतो. प्रत्येक वेळी इटालीय अक्षरांनीच महत्त्वपूर्ण मजकूर लिहिला जातो असेही नाही, उदा. सादरीकरणांमध्ये रंगबदल हा महत्त्वपूर्ण मजकुरासाठी अधिक परिणामकारक मार्ग ठरू शकतो. \emph
ह्या आज्ञेच्या तार्किक मांडणीमुळे आपल्याला त्या तपशिलाकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. महत्त्वपूर्ण मजकूर दाखवणे हे कार्य निरनिराळ्या जागा व त्यांच्या गरजा पाहून लाटेक्-द्वारे आपसूक सापेक्षतेने केले जाते.
अक्षरजुळणीच्या आज्ञा आपण प्रकरण ११मध्ये शिकणार आहोत, परंतु तोवर आपण परिचित आज्ञांमध्ये \textbf
ह्या आणखी एका आज्ञेची भर घालूया. ही आज्ञा कार्यघटकातील मजकुरास ठळक करते.
विभाग पाडणे
आत्तापर्यंत तुम्ही कदाचित एखादा मजकूर-संपादक वापरला असेल, ज्यात दस्तऐवज लिहिताना विभाग तयार करण्याकरिता मजकुराचा आकार वाढवणे, त्याला ठळक करणे व त्यानंतर एक मोकळी ओळ सोडणे ह्या गोष्टी क्रमवार कराव्या लागतात. लाटेक्-मध्ये ही अक्षरजुळणी आणखी सुलभ आहे, कारण \section
ह्या आज्ञेसह विभाग कसा दिसावा ह्यासाठीच्या सर्व सोयी लाटेक्-मध्ये आपोआप पुरवल्या जातात. विभाग कसा दिसावा ह्याचा विचार करण्याची वापरकर्त्या/वापरकर्तीला गरज नाही, किंबहुना विभाग कसा हवा ह्याचे ज्ञान आज्ञावलीला असणे आवश्यक आहे.
\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}
Hey world!
This is a first document.
\section{Title of the first section}
Text of material in the first section
Second paragraph.
\subsection{Subsection of the first section}
Text of material in the subsection.
\section{Second section}
Text of the second section.
\end{document}
आर्टिकल
हा लाटेक्-वर्ग वापरला असता, विभाग व उपविभागांना लाटेक्-तर्फे आपोआप आकडे दिले जातात. तसेच त्यांना ठळक अक्षरांतदेखील लिहिले जाते. हे दृश्यरूप बदलायचे कसे ह्याबाबत आपण प्रकरण ५ मध्ये पाहूया.
लाटेक्-दस्तऐवजांमध्ये पुढील स्तरांवरचे विभाग वापरता येणे शक्य आहे.
\part
(भाग/खंड. ह्या स्तराकरिता\documentclass{book}
,\documentclass{memoir}
अथवा\documentclass{report}
हे लाटेक्-वर्ग वापरणे आवश्यक.)\chapter
(प्रकरण. ह्या स्तराकरितादेखीलbook
,report
अथवाmemoir
हे लाटेक्-वर्ग वापरणे आवश्यक.)\section
(विभाग)\subsection
(उपविभाग)\subsubsection
(उपउपविभाग)
ह्याहून अधिक विभागणीदेखील शक्य आहे. ह्यापुढील स्तर परिच्छेदाचा आहे. तो \paragraph
ह्या आज्ञेसह मिळवता येतो. नवा परिच्छेद तयार करण्याची ही आज्ञा नाही. विभागांतर्गत सशीर्ष परिच्छेद तयार करणे हे ह्या आज्ञेचे मुख्य कार्य आहे.
एव्हाना एखाद्या दस्तऐवजाला शीर्षक कसे द्यायचे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्यात निर्माण झाली असेल. त्याकरिता काही विशेष आज्ञा आहेत, परंतु सर्वच लाटेक्-वर्ग त्या आज्ञा वापरत नाहीत, म्हणून आम्ही त्यांची नोंद एका वेगळ्या प्रकरणात घेत आहोत.
याद्या
याद्या लिहितानादेखील तार्किक मांडणीचा अतिशय उपयोग होऊ शकतो. लाटेक्-सह दोन प्रकारच्या याद्या सामान्यपणे तयार केल्या जातात. पुढील उदाहरण पाहा.
\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}
Ordered
\begin{enumerate}
\item An entry
\item Another One
\item Wow! Three entries
\end{enumerate}
Unordered
\begin{itemize}
\item An entry
\item Another One
\item Wow! Three entries
\end{itemize}
\end{document}
यादीतील प्रत्येक मुद्दा \item
ह्या आज्ञेने सुरू होत आहे ह्याची नोंद घ्या. फलितामध्ये दिसणाऱ्या मुद्द्याच्या दर्शकांची निवड लाटेक्-तर्फे आपोआप केली जाते. उदा. बिंदुक्रमित यादीकरिता बिंदू व अनुक्रमित यादीकरिता आकडे.
स्वाध्याय
विभागांच्या निरनिराळ्या स्तरांचा वापर करून पाहा. \documentclass{article}
ऐवजी \documentclass{report}
वापरून पाहा. ह्या लाटेक्-वर्गात \chapter
स्तरावरील विभाग तयार करता येतात. ते कसे दिसतात ते पाहा. \paragraph
व \subparagraph
ह्या आज्ञांचा वापर करून पाहा. ह्या आज्ञांतर्फे आकडे घातले जात नाहीत ह्याची नोंद घ्या.
काही याद्या तयार करून पाहा. याद्यांच्या पोटात याद्या तयार करून पाहा. लाटेक्-सह चारच याद्या एकमेकींच्या पोटात राहू शकतात. ह्याहून अधिक याद्या एकमेकींच्या पोटात ठेवणे बहुतांश वेळा वाईट मांडणीकडे झुकते.