शीर्षके
लाटेक् तीन तार्किक आज्ञांचा वापर करून दस्तऐवजाची पायाभूत माहिती (मेटाडेटा) साठवते व एका आज्ञेसह तो छापते.
\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}
\author{A.~N.~Other \and D.~Nobacon}
\title{Some things I did}
\date{1st April 2020}
\maketitle
Some normal text.
\end{document}
\author
, \title
व \date
ह्या आज्ञा माहिती साठवतात व \maketitle
ही आज्ञा ती माहिती छापते. अनेक लेखक असतील, तर त्यांची नावे \and
ह्या आज्ञेसह वेगळी केली जातात. \author
, \title
व \date
ह्या आज्ञा \maketitle
आज्ञेपूर्वी येणे आवश्यक असते. येथे आपण ह्या आज्ञा document
क्षेत्रात लिहिल्या आहेत. त्या आज्ञापीठातही लिहिता येणे शक्य आहे.
\maketitle
ह्या आज्ञेचे फलित लाटेक्-वर्गावर अवलंबून आहे. (पाहा: प्रकरण ५). titlepage
ह्या क्षेत्रासह स्वतःचे मुखपृष्ठदेखील बनवता येणे शक्य आहे, परंतु ह्या प्रकरणाच्या मुख्य विषयात ते बसत नाही, त्यामुळे इथे त्याची चर्चा पुरे. जर मुखपृष्ठाची रचना स्वतःच करायची असेल, तर memoir
सारखा लवचीक लाटेक्-वर्ग वापरावा, अन्यथा book
हा मूळ लाटेक्-मधील आज्ञासंच वापरावा.
वर्णनक्रमित याद्या
अनुक्रमित व बिंदुक्रमित याद्यांप्रमाणेच लाटेक्-मध्ये वर्णनक्रमित याद्यादेखील घडवता येतात.
\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}
\begin{description}
\item[Dog:] member of the genus Canis, which forms part of the wolf-like canids,
and is the most widely abundant terrestrial carnivore.
\item[Cat:] domestic species of small carnivorous mammal. It is the only
domesticated species in the family Felidae and is often referred to as the
domestic cat to distinguish it from the wild members of the family.
\end{description}
\end{document}
स्वाध्याय
\author
, \title
व \date
ह्या आज्ञांचे कार्यघटक बदलून फलितात होणारा फरक पाहा. ह्यांपैकी कोणत्या आज्ञा वापरणे \maketitle
आज्ञा यशस्वीरीत्या चालण्याकरिता अतिशय आवश्यक आहे?
काही वर्णनक्रमित याद्या बनवा. त्यांना एकमेकींच्या पोटात लिहून पाहा. बिंदुक्रमित अथवा अनुक्रमित याद्यांच्या पोटात वर्णनक्रमित याद्या लिहून पाहा.