लाटेक् दस्तऐवज
texdoc
ही आज्ञा पूर्वी म्हटल्याप्रमाणे हस्तपुस्तिका वाचण्याकरिता अत्यंत उपयुक्त आहे, परंतु त्याव्यतिरिक्त लाटेक्-बाबत आणखी जिज्ञासा असेल, तर पुढील दुवेही उपयुक्त ठरू शकतात.
source2e.pdf
ह्या नावाने लाटेक्-ची स्वतःची बीजआज्ञावली टेक्-वितरणांत उपलब्ध आहे. वाचण्याकरिता आज्ञापटलावर texdoc source2e
लिहा अथवा texdoc.org ह्या दुव्यासह महाजालावर वाचा.
नवीन लाटेक् वितरणे लाटेक्-३ ही आज्ञावली वापरतात. ही आज्ञावली पूर्वी expl3
ह्या आज्ञासंचासह उपलब्ध होती. texdoc
सह expl3 आज्ञासंचाचा वापर (texdoc interface3
) अथवा expl3 बीज (texdoc source3
) वाचता येऊ शकते.