प्रकरण १४

लुआ

लुआटेक् चालक ओपनटाईप टंकांचा वापर करण्याची क्षमता झीटेक् ह्या चालकाप्रमाणे पुरवतोच, परंतु लुआटेक् ह्या चालकासह टेक्-च्या इतर क्षमतादेखील मोठ्या प्रमाणावर विस्तारतात. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे लुआ आज्ञावलीचा लाटेक्-मध्ये समावेश. आज्ञावलीय जगतात जास्त प्रचलित असणाऱ्या पद्धतींसह काम करण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरते. टेक्-च्या अंतर्गत कार्यप्रणालीत हस्तक्षेप करून तिथे लुआमार्फत बदल करण्याचे सामर्थ्यदेखील ह्या आज्ञावलीत आहे.

लुआ आज्ञावली ह्या अभ्यासक्रमाचा भाग नाही, परंतु 2π हे गणित करणारे लहानसे उदाहरण पुढे पाहा.

%!TEX lualatex
\documentclass{article}

\begin{document}

$ 2\pi \approx \directlua{ tex.print(2 * math.pi) } $

\end{document}