लाटेक् शिका

लाटेक् ह्या उत्कृष्ट दस्तऐवजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या आज्ञावलीचे १६ सोप्या प्रकरणांतून विनामूल्य व मुक्त प्रशिक्षण.

प्रस्तावना

ह्या संकेतस्थळावर लाटेक्-ची तोंडओळख करून देण्यात येईल. लाटेक् ही उत्कृष्ट दस्तऐवज निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेली आज्ञावली आहे. लाटेक् आज्ञावलीसाठीच्या धारिका नव्या वापरकर्त्यांकरिता भयावह असू शकतात, कारण लाटेक् धारिकांचे स्वरूप इतर मजकूर-संपादकांसारखे एकल नसते. अशा नव्या वापरकर्त्यांना लाटेक्-चा परिचय करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. लाटेक्-ची एकच सर्वंकष शिकवणी तयार करणे हे ह्या संकेतस्थळाचे उद्दिष्ट नाही. आमच्या ध्येयाबाबत थोडे…

संकेतस्थळाची घडण

हे साधण्यासाठी आम्ही प्रथम १६ अतिशय महत्त्वाच्या विषयांची निवड करून, त्यांचे धडे तयार केले आहेत. प्रत्येक धडा ठरावीक विषयावर लक्ष केंद्रित करून बनवला असल्यामुळे शिकण्यास फार कालावधी लागणार नाही. प्रत्येक धड्यात आम्ही काही उदाहरणे तयार केली आहेत. ती तुम्हाला महाजालावर, तसेच तुमच्या संगणकावर चालवून पाहता येऊ शकतात. उदाहरणांबाबत थोडे…

प्रकरणे

प्रत्येक प्रकरणात आणखी थोडे ह्या सदरासह थोडी अधिकची माहिती जोडली आहे जेणेकरून सामान्य वाचकास आवश्यकता नसताना ती माहिती मार्गात येणार नाही, परंतु जिज्ञासू वाचकास ती वाचण्याची सोयदेखील उपलब्ध राहील.

संकीर्ण प्रकरणे

पुढील प्रशिक्षणाकरिता

लाटेक्-प्रशिक्षणाकरिता पुस्तक मिळवणं हा लाटेक् शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. शेवटच्या प्रकरणात आम्ही पुस्तकांच्या शिफारशींसह निरनिराळ्या साधनांची चर्चा करतो.