क्षेत्रांच्या अखेरीस दाखवल्या जाणाऱ्या अडचणी
काही क्षेत्रे (उदा. amsmath
व tabularx
) आतील मजकूर पाहण्यापूर्वी संपूर्ण क्षेत्राची पाहणी करतात. अर्थात मजकुरात कोणतीही अडचण आली, तरी ती क्षेत्राच्या शेवटच्या ओळीवर दाखवली जाते. तरीही आपण मुख्य प्रकरणात पाहिल्याप्रमाणे टेक्-ची अडचण दाखवण्याची पद्धत पाहता नेमकी अडचणीची जागा कळू शकते.
\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\usepackage{amsmath}
\begin{document}
\begin{align}
\alpha &= \frac{1}{2}\\
\beta &= \frak{2}{3}\\
\gamma &= \frac{3}{4}
\end{align}
\end{document}
ह्या उदाहरणात ११व्या ओळीवर अडचण नोंदवली जाते.
l.12 \end{align}
परंतु खरी अडचण पुढील ओळींमुळे दिसते.
! Undefined control sequence.
<argument> ...ha &= \frac {1}{2}\\ \beta &= \frak
{2}{3}\\ \gamma &= \frac {...
आधीच्या अडचणींमुळे अनपेक्षित अडचणी
जेव्हा लाटेक् आज्ञापटलावरून चालवले जाते, तेव्हा त्याला अडचणीच्या ठिकाणी x
म्हणून थांबवणे शक्य आहे. चालवणे थांबवल्यानंतर बीजधारिकेत आवश्यक ते बदल करून धारिका पुन्हा चालवल्यास फलित मिळते. परंतु लाटेक् चालवण्याकरिता जर तुम्ही एखादा मजकूर-संपादक अथवा महाजालावरील सेवा वापरत असाल, तर टेक् आणखी अडचणी दाखवू शकते, ज्या वास्तविक आज्ञावलीत आधी घडलेल्या चुकीचा परिणाम म्हणून उद्भवतात.
त्यामुळे अडचणींच्या संख्येमुळे घाबरू नका, कायम सर्वात आधी नोंदवलेल्या अडचणीवर लक्ष केंद्रित करा.
\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}
Text_word $\alpha + \beta$.
More text.
\end{document}
वरील आज्ञावलीतील अडचण _
ह्या चिन्हामुळे उद्भवलेली आहे. हे चिन्ह वास्तविक \_
असे लिहिले जायला हवे होते.
टेक् ह्या चुकीची अचूक नोंद पहिल्या अडचणीच्या वेळी घेते.
! Missing $ inserted.
<inserted text>
$
l.5 Text_
word $\alpha + \beta$.
?
परंतु ?
ह्या चिन्हासह तुम्ही टेक्-ला पुढे जायला सांगितलेत, तर ते $
हे चिन्ह स्वतः घालून पुढील _
ह्या चिन्हाचे अचूक आकलन करून घेते. ह्यामुळे सुरू झालेले गणित-क्षेत्र पुढील $
येईपर्यंत चालू राहते व त्यामुळे वरील उदाहरणातील \alpha
ह्या आज्ञेचा अर्थ लावला जाऊ शकत नाही.
! Missing $ inserted.
<inserted text>
$
l.5 Text_word $\alpha
+ \beta$.
?
अशा काही चुका ज्या अडचणी दाखवत नाहीत
ज्या अडचणी दस्तऐवजांच्या शेवटापर्यंत ओळखल्या जात नाहीत, त्या अडचणींचे थांबे निर्माण करत नाहीत, त्या लॉग-धारिकेतून पाहिल्या जाऊ शकतात.
पुढील आज्ञावली टेक्-लाईव्ह.नेट ह्या सेवेसह चालवून पाहिलीत तर तुम्हाला पीडीएफ्-फलित मिळेल. अडचण वाचण्याकरिता %!TeX log
हे प्राचल बीजधारिकेत समाविष्ट करा.
\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}
Text {\large some large text) normal size?
\end{document}
वरील उदाहरणात आकार बदलण्याची आज्ञा चुकून )
ह्या कंसासह संपवण्यात आली आहे. वास्तविक ती }
ह्या कंसासह संपवली जायला हवी. हे धारिकेच्या शेवटीच टेक्-ला समजते की एका गटाची सुरुवात होऊन तो संपलेला नाही. लॉग-धारिकेत टेक् हे नोंदवते की असा गट नेमका कोणत्या ओळीवर सुरू झाला आहे. टेक् हे ओळखू शकत नाही की वापरकर्त्याकडून कंस चुकला आहे, कारण )
हे टेक्-करिता विशेष चिन्ह नाही.
(\end occurred inside a group at level 1)
### simple group (level 1) entered at line 5 ({)